‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम गुरुचरण सिंग काही काळापासून चिंतेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या संघर्षाबद्दल एका मुलाखतीत त्यांनी सांगितले. एक महिन्यापासून ते कामाच्या शोधात आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मध्ये परतण्यासाठी ते निर्माते असित मोदी यांना विनवणी करत आहेत.
गुरुचरण सिंग ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये सोढीची भूमीका साकारत होते. दरम्यान, 2020 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. या वर्षाच्या सुरुवातीला ते मध्येच गायब झाले होते. घरी परतले तेव्हा त्यांची भेट ‘तारक मेहता का उल्टा’ चश्मा’ निर्माते असित मोदी यांच्यसोबत झाली.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये पुन्हा सोढीची भूमिका करण्यास गुरुचरण सिंग हे इच्छुक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गुरुचरण सिंग यांनी शोचे निर्माते असित मोदींना TMKOC शो मध्ये पुन्हा घेण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे.
शो मध्ये सध्या बलविंदर सिंग हे सोढीची भूमिका करत आहेत. बलविंदर सिंग यांना काढून आपल्याला शो मध्ये घ्यावं, अशी मागणी गुरुचरण सिंग यांनी निर्माता असित मोदींकडे केली. गुरुचरण सिंग यांनी यासाठी असित मोदींवर दबाव निर्माण केला. पण काही फरक पडला नाही. तसेच बलविंदर सिंग यांना अचानक काढून टाकण्याचे काहीही कारण आसित मोदींकडे नसल्याने त्यांनी गुरुचरण सिंग यांना स्पष्टपणे नकार दिला. न्यूज 18 ने हे वृत्त दिले आहे.