तेरा वर्षाच्या नात्यानंतर हिना खानचे ब्रेकअप? इंस्टाची गूढ पोस्ट होतेय व्हायरल

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टिव्ही अभिनेत्री हिना खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हिनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर विश्वासघाताबाबत गुढ पोस्ट शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यामुळे हिनाच्या लव्हलाईफमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातमीने हिनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते हिनाबाबत काळजी करु लागले आहेत. हिनाने इंस्टा स्टोरीवर रात्री उशीरा एक पोस्ट टाकली. विश्वासघात ही एकमेक खरी गोष्ट आहे जी टिकून राहते. दुसऱ्या पोस्टमध्ये हिनाने रिलेशनशिपबाबत मोठी बाब समोर आली आहे. ती लिहीते, ज्याने तुमचा विश्वासघात केला त्याच्यावर अंधपणाने विश्वास ठेवल्याबद्दल स्वतःला क्षमा करण्यास कधीही विसरू नका. कधीकधी चांगल्या हृदयाला वाईट गोष्टी दिसत नाहीत. हिना खानच्या या गूढ पोस्ट्सने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

 

चाहत्यांना हिनाच्या नात्यात आलबेल नसल्याची कुणकुण लागली आहे. नाहीतर हिनाने आतापर्यंत अशाप्रकारचे स्टेटस कधीच ठेवले नव्हते. हिनाने आता या पोस्टना इंस्टा स्टोरीवरुन डिलीट केले आहे. मात्र सोशल मीडियावर हिनाच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. त्यामुळे चाहते हिना आणि रॉकीमध्ये सर्वकाही ठिक राहूदे अशीच प्रार्थना करत आहेत. अनेक युजर्सना वाटतं की, हिना सध्या तणावाखाली आहे आणि चाहते तिला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. हिनाला मजबूत राहण्यासाठी सांगत आहेत. पण काही लोकं अशीही आहेत जे मानतात की हिनाचे लव्ह लाईफ सुरळित सुरु आहे. हे केवळ तिचा नवा प्रोजेक्ट प्रमोट करण्याचा मार्ग आहे. ही एक प्रमोशनल स्ट्रॅटेजी असू शकते. शेवटी खरं काय आहे हे तिच्यापेक्षा आणखी कोणाला माहित असणार.

हिना आणि रॉकी हे अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेकदा ते लग्न करणार असल्याच्या अफवा आल्या. पण हिना आणि रॉकी दोघांनी सांगितले की त्यांचे आता इतक्यात लग्न करण्याचा कुठलाच प्लॅन नाही. हिना आणि रॉकीची भेट 2009 मध्ये ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर झाली. तेव्हापासून ते दोघं एकत्र आहेत.