सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’चे शूटिंग झाले पूर्ण

बॉलिवूडचा सुलतान म्हणजेच सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. खुद्द सलमान खानने सिनेमाचे शुटींग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. याबाबत सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.

या घोषणेमुळे सिनेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, सलमानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, फोटोमध्ये तो खूपच चार्मिंग दिसत आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित बहुतांश माहिती गुप्त ठेवली असून, फक्त काही लूक्स आणि टिझर रिलीज केला आहे जेणेकरून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्साह वाढेल.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई, किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.