
अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बिनधास्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने गळ्यात लक्ष्मीचा नेकलेस घालून लाल रंगाचा डीप नेक आउटफिट घातला आहे. हे पाहून सोशल मीडियावर यूजर्स संतापले असून त्यांनी तापसीला ट्रोल केले आहे.
तापसी पन्नूने लॅक्मे फॅशन वीकमध्ये लाल रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता. तापसी पन्नू व्हिडिओने लाल रंगाच्या बोल्ड नेक ड्रेससह गळ्यात लक्ष्मी असलेला नेकलेस घातला आहे. जेव्हा तिने फॅशन वीकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा तिच्या लुकचे कौतुक करण्याऐवजी युजर्स तिच्यावर संतापले आणि तिने हिंदू देवीचा अपमान केल्याचा आरोप केला.
View this post on Instagram
तापसीचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. युजर्स तिला ट्रोल करत आहेत. तापसी पन्नू फॅमिली तिच्या फॅशन वीक लूकमुळे इंटरनेटवर खूप ट्रोल होत आहे. युजर्स म्हणतात की, तापसीने परिधान केलेले कपडे खूपच रिविलिंग होते, अशा परिस्थितीत तिने लक्ष्मी नेकलेस घालायला नको हवा होता. आता ती यूजर्सकडून ट्रोल होत आहे.