सैफच्या त्या वक्तव्यामुळे ‘विक्रम वेधा’ संकटात, सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड

लाल सिंग चढ्ढानंतर आता ‘विक्रम वेधा’ही सोशल मीडियावर बॉयकॉट होत आहे. यावेळी सैफचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर युजर्स सैफवर चांगलेच संतापले आहेत. त्याचे ते वक्तव्य पाहून युजर्स त्याला ट्रोल करत आहेत. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉटचा ट्रेण्ड सुरु झाला आहे.

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सैफ अली खान ही तगडी स्टारकास्ट असलेला बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र प्रदर्शाच्या दोन दिवसाआधीपासूनच या सिनेमाला विरोध करण्यात आला आहे. झालं असं की, सैफ अली खानचा एक जुना व्हिडीयो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफ बोलतोय की, रामाच्या नावावरुन मी माझ्या मुलाचे नाव ठेऊ शकत नाही. त्या व्हिडीओत करीनाही दिसत आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलाचे नाव तैमूर असल्याचे सांगत मुघलांची प्रशंसा करताना दिसत आहे. सैफ आणि करिनाचा हा व्हिडीओ पाहून युजर्स दोघांवर संतापले आहेत.

सैफ सांगतोय, मी माझ्या मुलाचे नाव अलेक्झेंडर नाही ठेऊ शकत आणि वास्तवता पाहत त्याचे नाव रामही ठेऊ शकत नाही, मग चांगले मुस्लिम नाव का नाही? जसं की व्हिडीओत सैफ पुढे सांगतोय की, मुलांना सेक्युलर वॅल्यूजसोबत  घडवणार. जिथे एकमेकांचा आदर करायला शिकेल असे तो बोलला होता. मात्र ट्रोलर्संना ट्रोल करण्याची संधी मिळाली आहे,.

सैफ अली खानच्या या व्हिडीओबरोबरच करीना कपूर खानचीही एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दाखवले गेले आहे की, एका रिअॅलिटी शो मध्ये दुलकर सलमान पाहुणा कलाकार म्हणून येतो आणि सोनम कपूर त्याला विचारते दुलकरचा काय अर्थ आहे. त्यावर तो बोलतो हे एक अरेबिक नाव आहे. ते नाव अलेक्झेंडरशी मिळतेजुळते आहे. यावर करीना बोलते ओह…योद्ध्यासारखे..जसे तैमूर

सैफ अली खानचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स अभिनेत्यावर आपला राग काढत आहेत. त्याचा ‘विक्रम वेधा’ सिनेमा बॉयकॉट केला जात आहे. एका युजरने लिहीलेय, याची पत्नी करीना कपूर आहे आणि हा मुलाचे नाव रामावरुन ठेऊ शकत नाही, असे का? तर अन्य एका युजरने, विक्रम वेढा सिनेमा आपटला, संपता टाटा बाय बाय तर काहींनी मुळ सिनेमा पाहिला असल्याने पुन्हा हा सिनेमा का पाहावा असा प्रश्न उपस्थित केला आहे.

‘विक्रम वेढा’ हा सिनेमा तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचे तामिळ व्हर्जन 2017 साली प्रदर्शित झाले होते. मुळ सिनेमात आर माधवन आणि विजय सेतुपति महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘विक्रम वेधा’ या ,सिनेमाला पुष्कर गायत्रीने दिग्दर्शन केला आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे.