Photo – कोल्हापूरी चप्पल, हातात बांगड्या घालून ‘ही’ अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अलिकडे तिचा आगामी सिनेमा ‘गुड लक जेरी’ मुळे चर्चेत आली आहे. या गोष्टीत काही शंका नाही की जान्हवी आपली आई आणि सुपरस्टार श्री देवी सारखीच सुंदर आहे. जान्हवी सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता जान्हवीचे हिंदुस्थानी पोशाखातील फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या सोबर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचे हे लूक प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फ्लॉवर प्रिंटेड डीपनेक ड्रेसमध्ये आहे. तिच्या नव्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिला हिंदुस्थानी पोशाखात पाहून चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

जान्हवी कपूरने स्लीव्हलेस पिवळा सूट परिधान केला होता जो तिने ऑर्गेन्झा दुपट्ट्यासह स्टाईल केला होता. जान्हवीने कोल्हापुरी चप्पल, हातात ब्रेसलेट आणि कानात सुंदर झुमके घालून तिचा लूक पूर्ण केला.

जान्हवीच्या या सिंपल लूकने तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. हिंदुस्थानी पोशाखामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

या पिवळ्या ड्रेसवर तिने मोकळे केस सोडले असून त्यावर सोबर मेकअप केला आहे.

जान्हवी पुढच्या सिनेमात वरुण धवनसोबत बवालमध्ये दिसणार आहे. नुकतीच या सिनेमाचे शुटींग पूर्ण झाले असून हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.