Photo – अनिता भाभीचा ग्लॅमरस अंदाज

प्रसिद्ध टिव्ही शो ‘भाभी जी घर पर है’ मध्ये अनिता भाभी उर्फ गोरी मॅम ची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सौम्या टंडन. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. तिने गेल्यावर्षी या शोमधून निरोप घेतला होता. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.

नुकतेच अभिनेत्री सौम्या टंडनने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीचा निरागस चेहरा आणि गोड हास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून सौम्या टंडन टिव्ही इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सौम्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोत ती फारच सुंदर दिसत आहे. सौम्याने पोल्का डॉट ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.  या ड्रेसवर सौम्याने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. तसेच मोकळ्या केसांमध्ये तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. चाहत्यांच्या तिच्या फोटोंवरुन नजरा हटेनाशा झाल्या आहेत. 

सौम्या टंडनचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. टीव्हीशिवाय सौम्या आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘जब वी मेट’ चित्रपटात तिने करीना कपूरच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.