स्मृती इराणी यांनी वेट लॉस करून शेअर केला सेल्फी, एकता कपूर म्हणाली…

माजी अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि एकता कपूर यांची मैत्री कुणापासून लपलेली नाही. स्मृती इराणी आणि एकता यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेत काही वर्षांपूर्वी एकसोबत काम केलं होतं. इतक्या वर्षांनंतरही त्यांची मैत्री आहे तशीच कायम आहे. सोशल मीडियावर दोघेही अनेकदा एकमेकांचे कौतुक आणि प्रोत्साहित करताना दिसतात. आता स्मृती इराणी यांच्या एका सेल्फीवर एकता कपूरने कमेंट केली आहे.

स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी वेट लॉस केल्याचे दिसून येत आहे. यावर एकता कपूरने कमेंट करत लिहिलं आहे की, thinnnnnn. एकताच्या कमेंटवर स्मृती इराणी यांनी हार्ट इमोजीने रिप्लाय दिला आहे. फोटोमध्ये स्मृती इराणी या नो मेकअप लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘काही वेळ झाला आहे.’

एकताच नाही तर स्मृती इराणी यांच्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. स्मृती इराणीचा हा लुक त्यांच्या चाहत्यांना त्यांनी तुळशी या मालीकेत साकारलेल्या भूमिकेची आठवण करून देत आहे. त्यांच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, ‘मॅम तुम्ही पातळ आणि सुंदर दिसत आहात.’ तर आणखीन एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘स्मृती इराणी बहुदा इंडस्ट्रीमध्ये पुन्हा कमबॅक करणार आहेत.’ दरम्यान, स्मृती इराणी यांना क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. ही मालिका 8 वर्षे चालली.

आपली प्रतिक्रिया द्या