तेजस्वी प्रकाश झळकणार मराठी चित्रपटात

‘बिग बॉस 15’ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्या ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मराठमोळ्या तेजस्वीनीने गेली अनेक वर्षे संस्कार – धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, बिग बॉस 15 आणि नागिन – 6 या हिंदी मालिकांतून पसंती मिळवली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या पदार्पणाबाबत चाहते उत्सुक आहेत. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील ‘मुंबई मुव्ही टॉकीज’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा संकेत माने यांनी सांभाळली आहे.