‘कॉमेडी किंग’ जेरी लुईस यांचे निधन

29
सामना ऑनलाईन । लास वेगास
दिग्गज विनोदवीर आणि प्रसिद्ध अभिनेते जेरी लुईस यांचे अमेरिकेतील लास वेगासमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. लुईस हे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते.
लुईस यांनी १९५० च्या दशकात गायक डीन मार्टीन यांच्यासोबत १६ चित्रपट केले. या चित्रपटांतील लुईस यांच्या अभिनयाला सिनेप्रेमींनी चांगली दाद दिली. काही चित्रपट सुपरहिट झाले. या चित्रपटांनी लुईस यांना ओळख मिळवून दिली. नॉटी प्रोफेसर, द बेलबॉय, लेडीज मॅन या चित्रपटांतील लुईस यांचा अभिनय गाजला. त्यानंतर ते अनेक टीव्ही शो, नाइट क्लब आणि कॉन्सर्टमध्ये आपल्या स्टँडअप कॉमेडी प्रोग्रामसाठी प्रसिद्ध झाले. डीन मार्टीन आणि लुईस यांच्या ‘मार्टिन आणि लुइस’ या कॉमेडी शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रसिसाद मिळाला.
जेरी लुईस यांना अमेरिकन कॉमेडी अवॉर्ड, लॉस अँजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन आणि व्हेनिस फिल्म फेस्टिवल अशा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लुईस यांच्या निधनावर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांनी शोक व्यक्त केला. प्रसिद्ध विनोदवीर जीम कॅरी तसेच बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी लुईस यांच्या निधनानंतर ट्विटरवरून शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या