हिंदुस्थानींचा अमेरिकेतील प्रवेश झाला विनाकटकटीचा

11

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

सुरक्षेच्या कारणामुळे अमेरिकेच्या विमानतळांवर केली जाणारी तपासणी ही इतकी कटकटीची आणि वेळखाऊ असते की त्यामुळे व्यक्ती मेटाकुटीला येते. हिंदुस्थानी कलाकार, राजकारणी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना याचा वाईट अनुभव अनेक वेळा आला आहे. मात्र, आता हिंदुस्थानचा समावेश जागतिक प्रवेश कार्यक्रमांतर्गत (ग्लोबल एन्टी प्रोग्राम) केल्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांचा अमेरिकेतील प्रवेश विनाचौकशी आणि कटकटीविना होणार आहे.

ग्लोबल एन्टी प्रोग्रामांतर्गत प्रवेश मिळणारा हिंदुस्थान ११ वा देश ठरला आहे.  या आधीच्या देशांमध्ये अर्जेंटिना, कोलंबिया, जर्मनी, मेक्सिको, नेदरलँड, पनामा, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडचा समावेश होता.   अमेरिकेच्या कस्टम ऍण्ड प्रोटेक्शन बॉर्डरने हिंदुस्थानचा समावेश ग्लोबल एन्टी प्रोग्रामांतर्गत केला.

आपली प्रतिक्रिया द्या