कमी जोखीम आणि जास्त परतावा देण्यासाठी म्युचुअल फंड ओळखले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच यात कमी रकमेपासून गुंतवणूक करण्याची सुविधा असून एसआयपी म्हणजेच प्रत्येक महिन्याला ठकाविक रकमेचीही गुंतवणूक करता येते. असा एक म्युचुअल फंड असून त्याने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहेत. तसेच तीन वर्षांत गुंतवणूकदारांची रक्कम दुपटीने वाढली आहे. या म्युचुअल फंडमध्ये 10 हजार रुपयांची महिन्याची गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम 1.82 कोटींवर पोहचली आहे. आदित्य बिरला सन लाइन फ्रंटलाइन इक्विटी फंड (Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund) असे या फंडचे नाव आहे. हा फंड 30 ऑगस्ट 2002 रोजी सुरू झाला होता. तेव्हापासून या फंडने वार्षिक 19.25 टक्के रिटर्न दिले असून दर तीन वर्षात गुतंवणूकदारांची रक्कम दुप्पट झाली आहे. वार्षिक 19.25 च्या आकडेवारीप्रमाणे 20 वर्षात जबरदस्त परतावा मिळतो. दर महिन्याला 10 हजारांची गुंतवणूक करणाऱ्यांचे आता 1.82 कोी रुपये झाले आहेत. गेल्या 10 वर्षात या फंडने एनुलाइज्ड सिप रिटर्न 13.35 टक्के दिले आहेत. तसेच 10 हजारांची एसआयपी 24.04 लाख रुपये झाली आहे. तर पाच वर्षात ही रक्कम 8 लाख 61 हजार झाली आहे. 5 वर्षात या फंडने 14.45 टक्क्यांनी गुंतवणुदारांचे पैसे वाढवले आहेत. तसेच 3 वर्षात या फंडने 19.5 टक्क्यांचा फायदा दिला आहे. या काळात 10 हजाराच्या एसआयपीचे 4.82 लाख झाले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा फंड चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे.