‘या’ देशात पुरुषांनी दोन विवाह करणे बंधनकारक, आक्षेप घेतला तर होते जन्मठेपेची शिक्षा

लग्न आणि धार्मिक विधी याबाबत प्रत्येक देशात आणि राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. प्रत्येक देशाच्या चालीरिती आणि परंपरा यामध्येही वैविध्य आहे. कालांतराने जसा काळ बदलला तसा चालीरितींमध्येही बदल होत गेले, मात्र आजही एक असा देश आहे, जेथे पुरुष ‘या’ विचित्र प्रथेचे पालन आजही करतात.

आफ्रिका खंडातील इरिट्रिया या देशात पुरुषांनी दोन विवाह करणे बंधनकारक आहे. ही प्रथा पाळण्यास पुरुषाने नकार दिल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे येथील महिलादेखील पतीला पुनर्विवाह करण्यापासून रोखू शकत नाहीत. या पुरुषांच्या पहिल्या पत्नीने नवऱ्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई होऊ शकते. या विचित्र प्रथेमागील कारण म्हणजे देशातील महिलांची संख्या जास्त आहे.

या देशातील समाजही पुरुषाने दोनदा लग्न केल्यावरच त्याचा स्वीकार करतो. एखाद्या पुरुषाची इच्छा नसली किंवा तो सुखी किंवा दु:खी कोणत्याही अवस्थेत असला तरीही त्याने दोन बायका सांभाळाव्यात, असा कायदा या देशात आहे. त्यामुळे पुरुषाला इच्छा नसतानाही दोन लग्नांची सक्ती या देशात आहे. या विचित्र कायद्यामागील कारण म्हणजे इरिट्रियामध्ये पुरुष आणि महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे समतोल साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्येक पुरुषाने दोन महिलांशी लग्न करणे हा आहे. पुरुषाला एकच पत्नी असेल तर तो या देशात कायद्याने दोषी ठरतो.

या विचित्र पद्धतीमुळे इरिट्रिया हा देश टीकेला बळी पडला आहे, मात्र आपल्या देशांतर्गत समस्या सोडवण्याबद्दल चौफेर टीका झाल्यानंतरही, अनेक देशांना असे विचित्र निर्णय घेणे आवश्यक असलेले कायदे करणे भाग पडते. प्रत्येक देशाप्रमाणेच, लग्न, नोकरी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या सामान्य गोष्टींमध्ये वयोमर्यादा वेगळी असते तसेच शिक्षेची तरतूदही वेगळी आहे.