#MeToo …असं वाटलं माझ्यावर डोळ्याने बलात्कार होतोय, ईशाचा गौप्यस्फोट

91

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात सुरू असलेल्या #MeToo या चळवळीअंतर्गत अनेक बड्या व्यक्तींनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या कथा सोशल माध्यमांवर व्यक्त केल्या. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी देखील आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला. आता यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. अभिनेत्री ईशा गुप्ता हिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आपल्यासोबत झालेला प्रसंग शेअर केला आहे. यात तिने एक व्यक्ती माझ्याकडे असा पाहात होती की मला माझ्यावर डोळ्याने बलात्कार होतोय, असे वाटल्याचे तिने म्हटले आहे.

‘माझ्यासारख्या मुलीला जर देशात असुरक्षित वाटत असेल तर इतर मुलींचे काय. माझ्यासोबत दोन सुरक्षारक्षक असतानाही मला असे वाटत होते की माझ्यावर डोळ्याने बलात्कार होत आहे’, असे ट्वीट ईशाने केले आहे. या ट्वीटमध्ये तिने त्या व्यक्तीला देखील टॅग केले आहे. तिच्या या ट्वीटनंतर चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ईशा हा स्टंट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काहींनी तिला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ईशाने टॅग केलेला व्यक्ती दिल्लीतील एक व्यवसायिक असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हा कधीचा प्रकार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या