युरो फुटबॉल चॅम्पियनशिप- एका विजयासह डेन्मार्क बाद फेरीत; बेल्जियमची विजयाची हॅटट्रिक

सलामीच्या लढतीत सहकारी ख्रिस्तीयन एरिक्सन मैदानावरच कोसळला. मनस्थिती नसतानाही त्यानंतर मैदानात उतरणाऱया डेन्मार्कला फिनलॅण्डकडून हार सहन करावी लागली. फिफा रँकिंगमध्ये अक्वल स्थानी असलेल्या बेल्जियमला कडवी झुंज दिल्यानंतर डेन्मार्कला दुसऱया पराभवाचा सामना करावा लागला. ख्रिस्तीयन एरिक्सन हॉस्पिटलमधून बरा होऊन संघ सहकाऱयांना भेटायला आला. यानंतर डेन्मार्क संघाचा आत्मविश्वास उंचावला. या संघाने रविवारी मध्यरात्री झालेल्या युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील लढतीत रशियाला 4-1 अशा फरकाने धूळ चारली आणि एक विजय व तीन गुणांसह सरस गोल फरकाच्या जोरावर बी गटामधून बाद फेरीत आगेकूच केली. दरम्यान, याच गटामधून बेल्जियमने साखळी फेरीत सलग तीन विजयांसह अक्वल स्थान पटकावत पुढे पाऊल टाकले.

नेदरलॅण्ड, ऑस्ट्रिया अंतिम 16मध्ये

सी गटामधून नेदरलॅण्ड व ऑस्ट्रिया या संघांनी अंतिम 16फेरीत प्रवेश केला. नेदरलॅण्डने अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत नॉर्थ मॅसेडोनियाला 3-0 असे हरवले व तीन विजयांसह नऊ गुणांची कमाई केली. ऑस्ट्रियाने युव्रेनला 1-0 असे पराभूत केले. ऑस्ट्रियाने दोन विजयांसह सहा गुणांनिशी या गटामधून नेदरलॅण्डसह घोडदौड केली.

फुटबॉलच्या रणांगणात वर्चस्व

रशियाविरुद्धच्या लढतीत डेन्मार्कच्या फुटबॉलपटूंचेच वर्चस्व दिसून आले. या लढतीत डेन्मार्कच्या खेळाडूंकडे 61 टक्के फुटबॉलचा ताबा होता. डेन्मार्ककडून मिकेल डॅम्सगार्ड (38वे मिनीट), युसूफ पॉलसन (59वे मिनीट), आंद्रेस ख्रिस्तेनसन (79वे मिनीट) व जोकीम मेहेल (82वे मिनीट) यांनी दमदार गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. रशियाकडून एकमेव गोल करण्यात आला. अर्टेम झ्युबाने 70व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला.

तिन्ही संघांचे तीन गुण

बी गटात बेल्जियमने तीन विजय व नऊ गुणांसह रुबाबात बाद फेरीत प्रवेश केला. पण या गटातील उर्वरीत तीन संघांना प्रत्येकी तीन गुण कमवता आले. डेन्मार्क संघाने प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पाच गोल केले. तसेच त्यांच्याविरुद्ध चार गोल करण्यात आले. एक सरस गोलफरकाच्या जोरावर डेन्मार्कला आगेकूच करता आली. फिनलॅण्ड (-2) व रशिया (-5) यांचा गोलफरक निगेटिव्ह होता. त्यामुळे त्यांना पुढे वाटचाल करता आली नाही.

 फिनलॅण्डबेल्जियम लढतीची आकडेवारी

      फिनलॅण्ड  बेल्जियम

 • गोल     0       2
 • शॉट      7        17
 • शॉट ऑन टार्गेट 1            7
 • बॉलवरील ताबा 42          58
 • ऑफसाईड  0        2
 • कॉर्नर्स   0      5
 • यलो कार्ड   0        0
 • रेड कार्ड 0      0

रशियाडेन्मार्क लढतीची आकडेवारी

        रशिया     डेन्मार्क

 • गोल     1       4
 • शॉट      7       17
 • शॉट ऑन टार्गेट 6           16
 • बॉलवरील ताबा 39         61
 • ऑफसाईड  3         0
 • कॉर्नर्स   1      7
 • यलो कार्ड   2        1
 • रेड कार्ड 0      0
आपली प्रतिक्रिया द्या