हिंदुस्थानचा आत्मविश्वास पाहून ड्रॅगनची टरकली; युरोपीय थिंक टँकचे मत

1860

गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांशी झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्थानने चीनला आर्पले समार्थ्य दाखवून दिले आहे. चीन हिंदुस्थानमध्ये घुसखोरीसाठी कुरघोडी करत असतानाही सीमाभागातून मागे हटणार नाही, ही हिंदुस्थानची भूमिका चीनसाठी आव्हानात्मक आहे. या सर्व परिस्थितीत हिंदुस्थानचा आत्मविश्वास पाहून चिनी ड्रॅगनची टरकली असल्याचे मत युरोपीय थिंक टँकने व्यक्त केले आहे. हिंदुस्थान आता स्वबळावर चीनचा मुकाबला करण्यास समर्थ असल्याचे मतही थिंक टँकेने वर्तवले आहे.

चीनी सैन्याने पेगाँग सरोवराच्या फिंगर 8 पासून फिंगर 5 पर्यंतच्या हिंदुस्थानच्या भूभागात घुसखेरी केली आहे. चीनने फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घ्यावे, अन्यथा हिंदुस्थानही सीमाभागातून हटणार अशी ठाम भूमिका हिंदुस्थानने घेतली आहे. ही भूमिका घेण्यामागे हिंदुस्थानचा ठाम आत्मविश्वास दिसतो, असे थिंकटँकेने नमूद केले आहे. आपल्या आक्रमकतेमुळे हिंदुस्थान मागे हटेल, अशी चीनची अपेक्षा होती. मात्र, हिंदुस्थानचा आत्मविश्वास बघून ड्रॅगनचीच टरकल्याचे यूरोपीय फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीजने (ईएफएसएएस) म्हटले आहे. डोकलाम वादावेळीही हिंदुस्थानने ठाम भूमिका घेतली होती.

सैन्य मागे घेण्याचा देखावा करत चीनचे सैन्य मागे हटत नसल्याने हिंदुस्थाननेही चीनचे सैन्य मागे गेल्याशिवाय सीमेवरील हिंदुस्थानी जवान मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सीमावादावरून लक्ष हटवण्यासाठी चीनने द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, चीनच्या प्रत्येक कुरघोडीला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सध्याची परिस्थिती बघता चीनशी स्वबळावर मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान समर्थ असल्याचेही थिंकटँकने म्हटले आहे. त्यामुळे सहमतीने तणाव कमी करणे आणि सन्मानाने मागे हटणे, चीनच्या हिताचे असल्याचेही ईएफएसएएसने म्हटले आहे. हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ वाढल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती गंभीर झाल्यास किंवा गरज भासल्यासच हिंदुस्थान अमेरिका किंवा इतर देशांची मदत स्वीकारेल, अन्यथा चीनशी मुकाबला करण्यास हिंदुस्थान समर्थ असल्याचे थिंक टँकने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या