गोव्यात युरोपियन चित्रपट महोत्सव

39

सामना ऑनलाईन, पणजी
गोवा मनोरंजन संस्थेने गोव्यामध्ये युरोपियन चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे.  १ ते ८ जुलै या कालावधीमध्ये हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात एकूण २२ देशांतील २२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट प्रदर्शित केले जातील.बेल्जिअमच्या ‘फ्लाईंग होम’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरूवात होणार आहे.

डेलिगेशन ऑफ द युरोपियन युनियन, चित्रपट महोत्सव संचालनालय, माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार व गोवा मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.युरोपियन देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी गोमंतकीयांना मिळणार असून याचा बराच फायदा गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना होईल,अशी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली आहे.

महोत्सवाच्या आठ दिवसात कोणते चित्रपट दाखविले जाणार आहे ते वाचा

 • ‘द ड्रिम्ड वन्स’ (ऑस्ट्रीया),
 • ‘द जजमेंट’ (बुल्गेरिया),
 • ‘चेरी टोबॅको’ (इस्टोनिया)
 • ‘अ लोनली हिरो’ (इटली),
 • ‘फॅमिली मेंबर्स’(सिप्रस),
 • ‘नायस पिपल’ (स्वीडन),
 • ‘लिझा, द फॉक्स फेअरी’ (हंगरी),
 • ‘द कम्युन’(डेन्मार्क),
 • ‘थ्री हार्टस’ (फ्रांस),
 • ‘अ कॉमेडी ऑफ टिअर्स’ (स्लोव्हेनिया),
 • ‘लिटल विंग’ (फिनलँड),
 • ‘द लास्ट फॅमिली’ (पोलंड),
 • ‘द पोर्तुगील फालकॉन’ (पोर्तुगाल),
 • ‘पब्लीक वर्कस’  (नेदरलँड),
 • ‘हसन्स वे’ (स्पेन),
 • ‘सेंच्युअरी’ (जर्मनी),
 • ‘एम्पटीज’(झेकीया),
 • ‘व्हिजिबल वर्ल्ड’ (स्लोवाकीया),
 • ‘इनव्हिजिबल’ (ग्रीस),
 • ‘मॅलो मड’ (लॅटविया),
 • ‘हॉट हॉट हॉट’(लक्सेमबर्ग)

महोत्सवात ८ जुलैपर्यंत दिवसाला तीन चित्रपट दाखविले जातील. २ जुलै रोजी चार चित्रपट प्रदर्शित केले जातील. महोत्सवातील सर्व चित्रपट मॅकनिझ पॅलेसमध्ये प्रदर्शित करण्यात येतील. चित्रपट प्रदर्शनावेळी प्रथम येणार्‍यास प्रथम यानुसार, चित्रपटगृहात प्रवेश दिला जाईल असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या