जाहीर करूनही पुरग्रस्तांना अनुदान न दिल्याने कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावर रस्तारोको

540

शिरोळ तालुक्यातील  कुरुंदवाडकरांना शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे.  मात्र आज दिवसभर रांगेत राहूनही पूरग्रस्त नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले नाही.  त्यामुळे संतप्त झालेल्या पूरग्रस्त नागरीकांनी येथील शिवतीर्थ नजीक कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सानुग्रह अनुदान वाटप सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

महापुरात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिल्या टप्प्यात रोख पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे  जाहीर केले होते.  त्यानुसार तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील अंदाजे 6500 कुटूंबाना अनुदान वाटप सुरू झाले आहे.

कुरुंदवाड शहरात  प्रशासनाच्या 4  पथकांने  पूरग्रस्तांना रेशनकार्ड बँक पासबुक घेऊन  थेट पाच हजार रुपये रोख अनुदान देत आहे.  या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शहरवाशियांची रांगच्या रांग लागली आहे. गेल्या आठ दिवसापासून हे सानुग्रह अनुदान वाटप सुरूच आहे.  अनुदानाची रक्कम घेण्यासाठी आज पहाटे पासून नागरीकांनी रांग लावली होती. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही लहान मुलांना सोबत घेऊन रांगेत रागिलेल्या महिला तसेच वृद्ध महिला आणि नागरिक याचे अतोनात हाल होत आहेत. मात्र दुपारचे 4 वाजले तरी सानुग्रह अनुदान रक्कम वाटप सुरू झालीच नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पूरग्रस्त नागरीकांनी प्रशासनच्या विरोधात येथील शिवतीर्थ नजीक रस्तारोको आंदोलन केले.

यावेळी उदय डांगे, विलास उगळे, शाहीर आवळे, दयानंद मालवेकर, आयुब पट्टेकरी, शरद आलासे, अभिजित पाटील, इंदिरा माळी, मधुरा माळी, यांनी आंदोलनाचे नेतुत्व केले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत नीरावडे यांनी आंदोलकाची समजूत घातली आणि तहसीलदार गजानन गुरव यांच्याशी  भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून अस सानुग्रह अनुदान सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार उदय डांगे, दयानंद मालवेकर यांनी ताबडतोब अनुदान वाटप सुरू करावे, असे तहसीलदार गुरव यांना सांगितले आणि तहसीलदार गुरव यांनी पुन्हा सानुग्रह अनुदानाची रक्कम कुरुंदवाड पाठवून देऊन वाटप सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामुळे वाडी कुरुंदवाड मार्गावरील दुतर्फा वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या