चिरंजीवी म्हणतात अमिताभच हिंदुस्थानचे ‘मेगास्टार’

938

दक्षिणेकडील सुपरस्टार चिरंजीवीचा ‘सईरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाचा ढासू टिझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्य सैनिक उय्यलवाडा नरसिम्हा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

‘सईरा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सत्य घटनावर आधारित असून, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांपैकी एक असलेले उय्यलवाडा नरसिन्हा रेड्डी यांची हा ‘बायोपीक’ आहे. 1846 मध्ये उय्यलवाडा नरसिम्हा रेड्डी यांनी ब्रिटिशांविरूद्ध बंड पुकारले होते. या चित्रपटाचा टिझर हा अॅक्शन आणि इमोशनने भरलेला आहे. 62 वर्षीय चिरंजीवी यांचा अॅक्शन अवतार पाहून प्रभासच्या ‘बाहुबली’च्या आठवणी जाग्या होतील, असेच जाणवते. तसेच बिग बी अमिताभ बच्चन हे नरसिन्हा रेड्डीच्या गुरूच्या या भूमिकेतून दिसून येणार आहेत. या विषयी बोलताना चिरंजीवी म्हणाले की, ‘अमिताभ हे खऱ्या अर्थाने मेंटॉर आहेत. माझी त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही कारण अमिताभ हेच हिंदुस्थानचे मेगास्टार आहेत’.

sye-raa-narasimha-reddy

चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शिन सुरेंद्र रेड्डी यांचे आहे. किच्चा सुदीप, रवी किशन, निहारिका, जगपती बाबू, विजय सेतुपती, तमन्ना भाटिया, ब्रह्माजी आणि नयनतारा चिरंजीवी सोबत झळकणार आहे.

हा चित्रपट चिरंजीवीचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम या चार भाषांत प्रदर्शित करण्यात येणार आहे व हिंदी या भाषेमध्ये फरान अख्तर प्रदर्शित करणार आहेत. ‘सईरा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून. या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा वाढवणारा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या