दिवाळीला कोणीही रेशनपासून वंचित राहणार नाही : आमदार डॉ. राहुल पाटील 

42

सामना प्रतिनिधीपरभणी  

दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने सद्यस्थितीत उपलब्ध शिधापत्रिकेवरच रेशनचे वाटप करण्यात यावे. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंचा आदेश तूर्त स्थगित करुन त्यास मुदतवाढ देण्यात यावी. तसेच दिवाळीच्या तोंडावर कोणाताही नागरिक रेशन विना वंचित राहता कामा नये, अशी स्पष्ट सुचना आमदार डॉ. राहुल पाटील पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिली.

परभणी जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका धारक नागरिकांना दिवाळीपूर्वी साखर, गहू, तूरदाळ व इतर अन्नधान्याचे वाटप मुबलक प्रमाणात करण्यात करण्यात आल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही. तसेच शिधापत्रिकेस आधारकार्ड लिंक करण्याची ३१ ऑक्टोबरची मुदत रद्द करण्यात येऊन कोणाताही नागरिक रेशनविना वंचित राहता कामा नये, असे स्पष्टपणे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला बजावले आहे. अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे यांना दिलेल्या निवेदनावर आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह माजीमंत्री अ‍ॅड. विजयराव गव्हाणे, भाजप जि.प. सदस्य गणेशराव रोकडे यांच्या प्रमुख स्वाक्षर्‍या आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत आधारकार्डशी संलग्न करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश दिला आहे. वास्तविक पाहता मागील तीन-चार महिन्यापासून संबंधीत पोर्टल बंद असल्याकारणाने शिधापत्रिका आधारशी लिंक करण्यात अडचणी येत ओहत. त्यातच नागपंचमी, पोळा, महालक्ष्मी, दसरा या सणासुदींच्या काळात डिजिटलायझेन न झाल्यामुळे संबंधीत गावांचा अन्नधान्यांचा कोठा कमी करण्यात आला. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. पोर्टल व्यवस्थित कार्य करत नसणे ही शासनाची चुक नागरिकांच्या माथी मारण्यात आल्याने नागरिकांची सणासुदीच्या काळात अन्नधान्याविना हेळसांड झाली आहे. आगामी काळात दिवाळीचा सण तोंडावर असल्याने सद्यस्थितीत उपलब्ध शिधापत्रिकेवरच रेशनचे वाटप करण्यात यावे व तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंचा आदेश तूर्त स्थगित करुन त्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे, सरपंच रामकिशन शिंदे, उपसरपंच सोपानराव आरमाळ आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या