नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा?

10

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये घोळ झाला असून याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाला नोटीस बजावत चार आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

सामाजिक कार्यकर्ता राकेश मोहोड यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये निवडणूक नव्याने घेण्यात यावी आणि महापौरपदाच्या निवडणुकीवर स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार सदोष ईव्हीएम वापरून मतांची पळवापळवी करण्यात आली आहे.

यंदा बहुसदस्य प्रभाग पद्धती होती. यानुसार एका प्रवर्गातील उमेदवारांची यादी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांची यादी ईव्हीएमवर लावण्यात आली होती. सर्व प्रवर्गातील याद्यांचा रंग भिन्नभिन्न होता. मात्र, याउपरही मतदार संभ्रमित झाले होते. अनेकांचा मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. चार सदस्य असल्यास चार ईव्हीएमऐवजी दोन ईव्हीएमवरच याद्यांचे विभाजन करण्यात आले होते. यामुळे अनेक मतदारांना मतदान करताना गोंधळल्यासारखे झाले. मतदान कसे करावे हे न कळल्यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान केले. या संपूर्ण प्रकारावर याचिकाकर्त्याने प्रकाश टाकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या