दहशतवाद्यांनी घरात घुसून केली बीएसएफच्या निवृत्त जवानाची हत्या

सामना ऑनलाईन । बांदीपोरा

दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरामध्ये घरात घुसून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानाची हत्या केली. रमीझ अहमद पर्रे यांनी सीमा सुरक्षा दलामधून निवृत्ती घेतली होती आणि ते बांदीपोरामध्ये वास्तव्यास होते, अशी माहिती बीएसएफने दिली आहे.

घरात घुसलेल्या दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात रमीझ अहमद पर्रे यांचा मृत्यू झाला. पर्रे यांच्या घरातील ३ सदस्य गोळीबारात जखमी झाले.

याआधी स्नायपरचा वापर करून पाकिस्तान हिंदुस्थानच्या लष्करी चौक्या व गावांना टार्गेट करतो. पाकिस्तानचे तोफदळ वारंवार निवासी वस्तीवर हल्ले करते. या हल्ल्यांना उत्तर म्हणून बीएसएफने ‘ऑपरेशन अर्जुन’ केले होते. बीएसएफने ‘ऑपरेशन अर्जुन’ करुन सीमेजवळ राहणाऱ्या पाकिस्तानच्या आजी माजी सैनिकांचीच घरे व शेतं यांना लक्ष्य करुन गोळीबार केला होता. ‘ऑपरेशन अर्जुन’पुढे पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली होती.