Baba Siddique Murder – बाबा सिद्दीकी यांचा सरकारने खून होऊ दिला का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

prithviraj-chavan

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली पण हा खून राजकीय होता की खंडणी साठी होती असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने बाबा सिद्दीकी यांचा खून होऊ दिला का अशी शंकाही चव्हाण यांनी उपस्थित केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा खून राजकीय हेतूने प्रेरित होता की खंडणीसाठी होता? सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वी जिवे मारण्याची धमकी दिली होती हे खरे आहे की नाही? अशा परिस्थितीत त्यांना योग्य सुरक्षा का पुरवली नाही गेली? त्यांची खून होऊ दिला का? ही घटना खूप गंभीर असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

बदलापूर अत्याचार प्रकरणही एन्काऊंटर करण्यात आला. पण त्यामागे खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या खुनाचा कोणी कट रचला, त्याचा सुत्रधार कोण होता हे समोर येईल का? 90 च्या दशकात असेच खून होत होते आपण त्या काळात चाललोय का? संपूर्ण देशात मुंबई असे एकमेव शहर आहे त्यात दोन दोन पोलीस आयुक्त आहे. एक मुख्यमंत्र्यांचे लाडके आणि दुसरे गृहमंत्र्यांचे. महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस कोसळत आहे आणि याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. ती कोणी घेणार नाही असेही चव्हाण म्हणाले.