रत्नागिरीत माजी नगरसेवक अविनाश साटम यांचा कोरोनाने मृत्यू

454

भाजपचे माजी नगरसेवक अविनाश साटम यांचे कोरोनाने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. अविनाश साटम भाजपचे जुने कार्यकर्ते होते. ते 2001 आणि 2006 मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेत नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यांनी भाजप रत्नागिरी जिल्हासरचिटणीस आणि रत्नागिरी शहराध्यक्षपदी काम केले होते. जिल्ह्यात शनिवारी एकूण 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या 1826 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या