मनोज म्हात्रे हत्या प्रकरणाची मिरजेत पुनरावृत्ती,पंढरपूरच्या माजी नगरसेवकाचा खून

54

सुनील उंबरे,पंढरपूर

पंढरपूरचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. त्यांनी पंढरपूरातून पूर्वी काँग्रेसकडून नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली होती. काल संध्याकाळी मिरज ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये हरसिंग फाट्याजवळ त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला. पोलिसांना खरशिंग फाटा इथे त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचा खून का करण्यात आला याचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये. भुईटे यांची बोटं तुटलेली होती आणि डोक्यावरही वार करण्यात आले होते अशी माहिती मिळाली आहे.

भुईटे यांच्या हत्येमुळे भिवंडीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येची आठवण सगळ्यांना झाली. म्हात्रे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी बंदुकीने गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयते, तलवारीने वार करत हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या