पालिकेच्या चार रुग्णालयांत एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रीची नियुक्ती, रुग्णालयीन कामकाजाचा ताण कमी होणार

रुग्णालयीन कामकाजाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर या प्रमुख रुग्णालयात एक्झिक्युटिव्ह अॅडमिनिस्ट्रीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अधिष्ठातांवरील कामकाजाचा ताण कमी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात दररोज शेकडो बाह्य रुग्ण तपासणीसाठी येतात. रोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने रुग्णालयीन कर्मचाऱयांवर कामाचा ताण येतो आणि कामात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या प्रमुख रुग्णालयांच्या कामाची व्याप्ती बघता प्रत्येक गोष्टीत नियोजन करणे शक्य होत नाही. रुग्णालयीन कामकाज योग्य प्रकारे व्हावे, यासाठी प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी एक्झिक्युटिव्ह अॅडमिनिस्ट्रीची नियुक्ती करण्यात आली आहे.