बीपीसीएलच्या वतीने फाळणीवरील चित्रांचे प्रदर्शन

हिंदुस्थानच्या फाळणीवेळी झालेल्या भीषण दंगली आणि फाळणीचे चटके सोसलेल्या लाखो लोकांच्या स्मरणार्थ ‘पार्टिशन हॉरर्स रिम्बेबरन्स डे’ (फाळणी स्मरण दिन) साजरा केला जातो. फाळणीचे दुःख भोगलेल्यांच्या वेदनांची आठवण यानिमित्ताने देशाला करून दिली जाते. फाळणीबाबतचे सचित्र प्रदर्शन इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स यांनी एकत्रितपणे आयोजित केले असून ते 14 ऑगस्टपर्यंत सामान्यांना पाहायला खुले आहे. बीपीसीएलने देशभरातील 182 पेट्रोलपंपांवर हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.