आयआरसीटीसी देशभरातील रेल्वे प्रवाशांची भूक भागवणार

12

सामना ऑनलाईन, मुंबई

रेल्वे प्रवाशांची खानपान सेवा पुरविणारी आयआरसीटीसी आता लवकरच देशभरातील रेल्वे प्रवाशांची भूक भागविणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ताजे आणि सकस अन्न मिळणे शक्य होणार आहे.

आयआरसीटीसीचा लवकरच विस्तार होणार आहे. सध्या रेल्वेच्या आठ विभागांत आयआरसीटीसी कार्यरत आहे. पूर्वी संपूर्ण देशात आयआरसीटीसीकडे मेल-एक्स्प्रेसमध्ये खाद्य पुरवठा कंत्राट होते. नंतर रेल्वेने पुन्हा आपल्याकडे सगळी कंत्राटं घेतली. आता पुन्हा आयआरसीटीसीकडे जबाबदारी दिली जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात हे नवे धोरण जाहीर करण्यात आले होते असून त्याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नोएडा, अहमदाबाद, हावडा आदी आठ ठिकाणी आयआरसीटीसीचे बेस किचन आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे तयार करण्यात आलेले बेस किचन दिल्लीतील चार राजधानी आणि तीन शताब्दी गाडय़ांना आयआरसीटीसीमार्फत जेवण पुरविले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या