मंदी मानगुटीवर; ‘एक्स्पेडिया’ कंपनी 3000 कामगारांना कमी करणार

148

विविध क्षेत्रांना लागलेले आर्थिक मंदीचे ग्रहण अजूनही सरलेले नाही. मंदीच्या संकटामुळे ‘एक्स्पेडिया’ कंपनीतील तब्बल 3 हजार कामगारांना घरी बसावे लागणार आहे. ऑनलाईन पर्यटनातील या आघाडीच्या कंपनीने व्यवसायात अपेक्षित आर्थिक प्रगती न झाल्यामुळे नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या जगभरातील शाखांमधील कर्मचारी कमी केले जाणार आहेत.

‘एक्स्पेडिया’ कंपनीला 2019 मध्ये अपेक्षित आर्थिक प्रगती साधता आली नाही. व्यवसायाला मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे नोकर कपात करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. ही कंपनी हॉटेल्सडॉटकॉम, हॉटकायर, ट्रक्हेलॉसिटी, चिपटिकेट्स, इजेंसिया आणि काररेंटल या कंपन्या चालवते. नोकरकपातीबाबत जगभरातील 3 हजार कामगारांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कामगार हादरून गेले आहेत. 25 हजार 400 कामगारांपैकी 12 टक्के कामगारांना कामाकरून काढण्यात येणार आहे.

  • कंपनीपुढे व्यावसायिक प्रगती करण्याचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत नोकर कपातीमुळे कंपनीची 300 ते 500 दशलक्ष डॉलरची बचत होईल, असे कंपनीचे चेअरमन बॅरी डिलेर यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या