चॉकलेटप्रेमींसाठी दु:खद बातमी…

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चॉकलेट हा तमाम बच्चेकंपनीचा विक पॉईंट. बच्चेच कशाला, मोठ्यांनासुद्धा अनेकदा चॉकलेटचा मोह होतो. जिभेला आणि मनाला आनंद मिळवून देणारं चॉकलेट काही वर्षांनी कायमचे बंद होणार आहे. बसला ना धक्का..हो हे खर आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातून सन २०५० पर्यंत चॉकलेट नष्ट होणार असून दिवसेंदिवस वाढणारे ग्लोबल वॉर्मिंग व कोरड्या वातावरणाचा फटका चॉकलेटलाही बसणार आहे.

संशोधकांच्या मते, चॉकलेट बनविण्यासाठी कोका बियांचा वापर होतो. कोका बियांची रोपे अत्यंत नाजूक असल्याने ते ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यात जगू शकत नाहीत. या बियांना जगण्यासाठी वातावरण, पाऊस आणि आर्द्रता यांचे प्रमाण वर्षभर स्थिर असावे लागते. परंतु सध्या वातावरणात होणारे बदल लक्षात घेता या रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच जमिनीतील ओलावा शोषून घेतल्यामुळे अनेक भागात ही रोपं टिकवणं अवघड होणार आहे. नॅशनल ओशियानिक आणि अ‍ॅटमॉसफिअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, २०५० पर्यंत तापमानात प्रचंड वाढ झाल्याने चॉकलेटचे उत्पादन उंच पर्वतरांगावर घ्यावे लागणार आहे.

त्यामुळे येत्या काही वर्षात चॉकलेटचे उत्पादनात १००००० टन प्रतिवर्षी प्रमाणे घट होणार आहे. चॉकलेट उत्पादनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संशोधक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करित आहेत. हे तंत्रज्ञान कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक कॅण्डी कंपनी मार्स यांच्या मदतीने बनविले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या