हिंदुस्थानातून 2.6 लाख टन कांद्याची निर्यात

onion-5

 

हिंदुस्थानने चालू आर्थिक वर्ष जुलैपर्यंत 2.6 लाख टन कांद्याची निर्यात केली. राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नावर ही माहिती दिली. हिंदुस्थानने एप्रिल ते जुलै या काळात 2.60 लाख टन कांदा निर्यात केला आहे. गेल्या वर्षी 16.07 लाख टन कांदा निर्यात केला होता. नाफेडसारख्या संस्थांच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रातून 4.68 लाख टन कांदा खरेदी केला आहे.