मतमोजणी घोटाळा उघड, नाशिकमध्ये हवेत पोलिसांचा गोळीबार

21

तीन प्रभागांतील प्रक्रिया थांबविली

नाशिक – नाशिक महापालिका निवडणूक मतमोजणीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांच्या मुलाच्या प्रभागात मतदान यंत्रात फेरफार उघड झाली आहे. अन्य दोन प्रभागांतही असाच प्रकार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत असले तरी मतदान यंत्रात झालेली हेराफेरी, मतमोजणीत झालेला घोटाळा यामुळे या मुसंडीबाबत संशय व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये तीन मशीन सिल निघाले, तीन सुरू अवस्थेत आढळले. काही ठिकाणी प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा मतदान यंत्रात जास्तीचे मतदान आढळले. बाळासाहेब सानप यांचा मुलगा उभा असलेल्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये चार मशीन जास्त आढळले, पाचशेऐवजी सातशे मतदान त्या यंत्रात दाखविले जात आहे. यामुळे सायंकाळपासून येथील मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.

आपली प्रतिक्रिया द्या