पाकिस्तान बिथरला; लष्करप्रमुख बाजवा यांना 3 वर्षांची मुदतवाढ

414

पाकिस्तानने आपले लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना सोमवारी 3 वर्षांची मुदतवाढ दिली. याबाबत पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. पाकिस्तानातील आजची परिस्थिती पाहूनच बाजवा यांना ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निवेदनावर खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वाक्षरी केली आहे. बाजवा यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या