गाझियाबादमध्ये ‘पती पत्नी और वो’; गरोदर महिलेचा खून

856

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका व्यक्तीला महिलेच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 11 आणि 12 जानेवारी च्या दरम्यान या महिलेची हत्या झाली होती. तपासादरम्यान ही महिला गरोदर  होती हे देखील उघड झालं आहे. या महिलेचा खून कोणी केला याचं उत्तर शोधत असताना पोलिसांना महिलेचा नवराच याचा मुख्य सूत्रधार असल्याचं कळालं.

अमित ( बदललेलं नाव) याचं लग्न सारीका ( बदललेलं नाव) हिच्याशी झालं होतं. अमितचं प्रेम सारीकाची बहीण मोनावर ( बदललेलं नाव) जडलं होतं. मोनासोबतच्या प्रेमसंबंधांमध्ये सारीका आड येत होती. यामुळे अमितने सारीकाचा काटा काढायचं ठरवलं होतं. त्याने दोन भोंदू बाबांकरवी सारीकाला विष पाजण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो असफल ठरला.

मोनाच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या अमितला त्याची गरोदर बायको डोळ्यात खुपायला लागली होती. त्याने चोरीचा कट रचला आणि चोराने सारीकाचा खून केला असं दाखवण्याचं ठरवलं. ज्या भोंदूबाबांकरवी सारीकावर विषप्रयोग करण्याचा अमितने प्रयोग केला होता, त्याच भोंदूबाबांनी सारीकाला संपवण्यासाठी एक माणूस दिला होता. या आरोपीने त्याच्या तीन साथीरादांससह अमितच्या घरात प्रवेश केला आणि त्याने सारीकाचा गळा आवळून खून केला. मात्र या तीनही आरोपींच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. त्यांना अटक केल्यानंतर तिघांनी आपल्याला अमितने सुपारी दिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्याच्याआधारे पोलिसांनी अमितला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या