faशन paशन

डॉ.अमोल कोल्हे

आवडती फॅशन – जीन्स आणि कुर्ता.

फॅशन म्हणजे जी आपण स्वतः व्यवस्थित कॅरी करू शकतो, ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असता आणि इतरांना अनकम्फर्टेबल करत नाही ती म्हणजे फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?— जीन्स टीशर्ट, जीन्स शॉर्टशर्ट घालायला आवडतं.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – फॅशन म्हणजे मला वाटतं ऑटिटय़ूड.

आवडती हेअरस्टाईल?- सध्या तरी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत आहे तीच.

फॅशन जुनी की नवी? जुनी फॅशन नवीन होत असते आणि नवीन फॅशन जुनी होत असते. त्यामुळे काळानुरूप चालणारी फॅशन फॉलो करायला आवडते.

आवडता रंग? – पिवळा.

जवळच्या व्यक्तींना तुमची कोणती फॅशन आवडते जवळच्या माणसांना मी कुर्त्यामध्ये आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? – आवड़ते, पण आता ती करता येत नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – गॅजेट्स.

ज्वेलरीमध्ये काय आवडतं? – घडय़ाळं.

आवडता ब्रॅण्ड वेगवेगळ्या ब्रॅण्डचे कपडे वापरत असल्याने एक ब्रॅण्ड सांगता येत नाही.

फॅशन फॉलो कशी करता?- मी पर्टिक्यूलर कोणाला फॉलो करत नाही. पण इंटरनेट, फॅशन डिझायनर यांच्यामध्ये जे बघायला मिळते आणि त्यातून आपल्याला काय शोभेल याचा विचार करून ती फॉलो केली जाते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? – विशेष काही करावे लागत नाही. कारण माझी बायको ती जबाबदारी उत्तम सांभाऴते,

ब्युटी सिक्रेट पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम.

टॅटू काढायला आवडेल का?- नाही. कदाचित खूप जास्त वेळा ऐतिहासिक भूमिका करत असतो. त्यामुळे टॅटू नाही कॅरी करता येत.

बॅगेत हमखास असणाऱया गोष्टी पर्फ्यूम,  हेअर पिन.

फिटनेससाठी देअर इज नो शॉर्टकट्स टू फिटनेस.