कपड्यांवरची चित्रं

145

आज फॅब्रिक पेंटिंग या छंदाला व्यवसायाची जोड देता येते.

विविधरंगी नक्षी, निसर्गातील डोंगर, विविधरंगी फुले, पक्षी इत्यादी सौंदर्य स्वतःच्या कल्पकतेच्या बळावर ज्यांना कागदावर किंवा कपड्यांवर काढण्याची आवड आहे. जे विविधरंगी नक्षी काढण्यात रमतात ते फॅब्रिक पेंटिंग शिकून त्यामध्ये करीअर करून स्वतंत्र व्यवसायही करता येतो.

ज्यांना चित्रकलेची आवड आहे आणि फाईन आर्ट या शाखेत पदवी प्राप्त केली आहे, असे विद्यार्थी फॅब्रिक पेंटिंग शिकू शकतात. तसेच चित्रकलेशी संबंधित पेन्सिल शेडिंग, ड्राय पेस्टल, फॅब्रिक पेंटिंग, म्युरल आर्ट हे चित्रकलेचे नवीन कोर्सही बऱ्याचशा संस्थामध्ये शिकवले जातात. साडी, ड्रेसेस, फ्रॉक, बेडशीट, उश्यांचं अभ्रे, चादर यांना एक नवीन स्वरूप देता येते. प्लेन सिल्क बेस मटेरियलवर शिवलेल्या कुर्तीवरही हल्ली फॅब्रिक पेंटिंग केले जाते. स्त्रीयांसहित पुरुषांमध्येही या कलेला मागणी आहे.

फॅब्रिक पेंटिंग जोडव्यवसाय म्हणूनही करता येते किंवा छोट्या छोट्या संस्थांमध्ये किंवा घरगुती क्लास घेऊन इतरांनाही ही कला शिकवू शकता. स्वतःतील कौशल्याच्या बळावर स्वतंत्र उद्योग करून इतरांनाही रोजगाराची संधी मिळवून देऊ शकता.

आवश्यक गुण

  • फॅब्रिक पेंटिंग शिकण्याकरिता कल्पकतेची आवश्यकता असते. अनेक प्रकारच्या कपड्यांवर फुले, पाने किंवा साडी, टी-शर्ट, ड्रेसेस अशा पोषाखांवर साजेशी नक्षी काढून त्यात रंग भरण्याकरिता सौंदर्याचीही जाण असावी लागते.
  • बाजारात सध्या कोणत्या नवीन कलाकृतीची मागणी आहे, यासाठी शोधक वृत्ती

कोर्सेसची माहिती

  • दहावीनंतरही आवड म्हणून फॅब्रिक पेंटिंग शिकू शकता.
  • १२वी नंतर फॅब्रिक पेंटिंगचा प्रमाणपत्र कोर्स अनेक संस्था आणि महाविद्यातलयांमध्ये शिकवला जातो.
  • फाईन आर्ट पदवीचे शिक्षण घेत असतानाही फॅब्रिक पेंटिंग शिकवले जाते.
  • कोणत्याही शाखेतील विद्यार्थी आवड किंवा छंद म्हणून फॅब्रिक पेंटिंग शिकू शकतात.

शिकवणाऱ्या संस्था

  • सुबोध नार्वेकर कला वर्ग, शॉप क्रमांक ४, पुष्प मित, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई ६७
  • कला निकेतन आर्ट आणि क्राफ्ट क्लासेस, राजा शिवाजी विद्यालय संकुल, रोड क्र. ६, हिंदू कॉलनी, दादर
  • लेमार्क इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट, दामोदर वालजी बिल्डिंग, पहिला मजला, राजा राममोहन रॉय रोड, चर्नी रोड (पूर्व)
  • सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाईड आर्टस्, मुंबई
आपली प्रतिक्रिया द्या