फेसबुकने मानसिक अस्वास्थ्य

27

‘सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम’ हा सध्या जगभरच चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यातच आता अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेले नवे संशोधन काळजी वाढवणारे आहे. फेसबुकच्या अतिवापराने आपली मानसिकता संकुचित होत चाललेली असून आपण एककल्ली आणि पक्षपाती होत चाललो असल्याचे हे संशोधन म्हणते. सोशल मीडियावर आक्रमकता वाढत असून आपण फक्त आपल्या मतांशी जुळणारी मतेच वाचण्यास आणि त्या विचारांच्या लोकांना पाठिंबा देण्यात वेळ घालवतो असे हे संशोधन म्हणते. आपल्या विरोधातील मते सहन न होणे, त्यावरती आक्रमक होणेदेखील यामुळे वाढते आहे. विरुद्ध मतांच्या साहित्याकडे पूर्णपणे दुर्लक्षदेखील केले जात असल्याची नोंद यात देण्यात आलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या