फेसबुक ब्लड डोनेशन

१ ऑक्टोबर या राष्ट्रीय रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने फेसबुकने हिंदुस्थानी यूजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने हिंदुस्थानी यूजर्स रक्तदानासाठी या फीचरच्या मदतीने आपले नाव नोंदवू शकतात. हिंदुस्थानात सुरक्षित रक्ताची कमतरता आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक किंवा मित्र हे गरजेच्या वेळी फेसबुकच्या मदतीने रक्तदात्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. हे लक्षात घेऊन फेसबुकने सरळ या लोकांच्या मदतीसाठी हे खास फीचरच उपलब्ध करून दिले आहे. यामुळे रक्तदाते, गरजू लोक, हॉस्पिटल्स हे एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार आहेत. फेसबुकवर १ ऑक्टोबरपासून न्यूजफीडमध्ये या रजिस्ट्रेशनासाठी एक मेसेज दिसायला लागेल. इच्छुक रक्तदाते त्यावर क्लिक करून आपले नाव नोंदवू शकतील. हे रजिस्ट्रेशन ‘ओन्ली मी’ या स्वरूपात असेल. मात्र कोणी हे पब्लिक शेअर करणार असेल तर त्याची देखील सोय यात देण्यात आली आहे.