फेसबुक मेसेंजरवर खेळता खेळता करा लाइव्ह व्हिडिओ चॅट

सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुक मेसेंजरवर लाइव्ह चॅट करत इस्टंट गेम खेळणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. आता एफबी मेसेंजरवर लाइव्ह व्हिडिओ चॅट किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत इस्टंट गेम खेळता येणार आहेत.

आधी एफबी मेसेंजरवर इस्टंट गेम खेळणाऱ्यांना लाइव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय उपलब्ध होणार आहे. काही दिवसांनंतर लाइव्ह व्हिडिओ चॅटचा पर्याय दिला जाणार आहे. युझर लाइव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्ड करुन स्वतःच्या प्रोफाइलवर शेअर करू शकणार आहेत.

सध्या फेसबुक मेसेंजर अॅपद्वारे २४.५ कोटी युझर दर महिन्याला चॅटिंग करतात. याआधी फेसबुकने लहान मुलांसाठी मेसेंजर किड्स हे अॅप्लिकेशन लाँच केले होते. त्याला अनेक देशांतून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘इन्स्टंट गेम्स’चे नवे फीचर युझरना आवडेल, असा विश्वास फेसबुकच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या