फेसबुक व्हर्च्युअल असिस्टंट

65

फेसबुकने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी आपल्या मेसेंजरवरतीएमया नावाने व्हर्च्युअल असिस्टंट उपलब्ध करून दिला आहे. सध्या काही मोजक्या युजर्सलाच तो उपलब्ध झालेला असला, तरी टप्प्याटप्प्याने तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेने सज्ज असा हा व्हर्च्युअल असिस्टंट असणार आहे. खरे तर फेसबुकने गेल्याच वर्षी हा व्हर्च्युअल असिस्टंट मोजके युजर्स आणि विशेषतः डेव्हलपर्सना उपलब्ध करून दिला होता. प्रायोगिक पातळीवरती याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. या सगळ्या परिश्रमानंतर आता हाएमअपडेटच्या स्वरूपात मेसेंजरसाठी सज्ज झालेला आहे. मेसेंजरवरती गप्पा मारत असताना विविध शब्द सुचवणे, सिनेमाची चर्चा सुरू असल्यास तो सिनेमा जवळच्या थिएटरमध्ये असल्यास तसे सूचित करणे, लोकेशन शेअर करणे अशी बरीच भन्नाट कामे हाएमकरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या