फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन, युजर्सची प्रचंड घालमेल

इंस्टाग्राम, फेसबुक काही तासांसाठी तरी बंद पडले तरी युजर्सना अक्षरशः जग थांबल्यासारखे वाटते. गुरुवारी दुपारी दीड वाजता इंस्टाग्राम, फेसबुक अचानक बंद पडले आणि युजर्सची प्रचंड घालमेल झाली. व्हिडीयो, फोटो किंवा काहीही शेअर करता न आल्यामुळे अडचण झाली. तर बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लोकप्रिय मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपही बंद पडले होते. त्यामुळे मेसेज पाठवता येत नव्हते किंवा येतही नव्हते. त्यामुळे मेटाला मोठा फटका बसला.

सेवा ठप्प झाल्याची माहिती युजर्सनी ट्विटरवर दिली तसेच #instagramdownचा ट्रेंड सुरू झाला. हॅशटॅगचा वापर करून असंख्य तक्रारी केल्या. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाले आणि सोशल मीडियावर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडायला लागला. सोशल मीडिया कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागला. तब्बल 36 टक्के लोकांना सर्व्हर कनेक्शनचा सामना करावा लागला तर 22 टक्के लोकांनी त्यांना लॉगईन करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले.