अंखी दास यांचा फेसबुकला रामराम! पब्लिक पॉलिसी संचालकपदाचा दिला राजीनामा

हिंदुस्थानातील फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे. नुकतेच आंखी दास डेटा संरक्षण विधेयक 2019 वरील संसदेच्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या. या समितीच्या अध्यक्षा भाजपा खासदार मिनाक्षी लेखी आहेत.

काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर हेट स्पीच आणि राजकीय पक्षपातीपणाचा आरोप झाला होता. अमेरिकन वृत्तपत्रा हवाला देत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले होते, ज्यात फेसबुक हिंदुस्थानात हेट स्पीच विरोधात कारवाई करत नसल्याचे सांगितले होते.

फेसबुकनेही या आरोपांवर उत्तर देत म्हटलं होतं की, ते हेट स्पीच विरोधात कारवाई करण्याबाबत आम्ही सतर्क आहोत. आम्ही आमच्या धोरणानुसार कोणत्याही राजकीय पक्ष आणि धर्माला प्राधान्य देत नसून निष्पक्षताने आपलं काम करतो.

23 ऑक्टोबर रोजी आंखी दासला विचारण्यात आले होते प्रश्न

23 ऑक्टोबर रोजी अंखी दास भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखाली डेटा संरक्षण विधेयक 2019 च्या संसदेच्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याशी दोन तासांपर्यंत अनेक प्रश्न विचारण्यात आले. या बैठकीत उपस्थित एका सदस्याने सांगितले की, सोशल मीडिया कंपनीला आपल्या जाहिरातदारांच्या व्यावसायिक फायद्यासाठी किंवा निवडणुकांच्या उद्देशाने आपल्या ग्राहकांच्या डेटाशी छेडछाड नाही केली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या