पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या वेळी क्राऊन प्रिन्सने घातले भगवे वस्त्र? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

अबु धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत हात मिळवतानाचा पंतप्रधान मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये क्राऊन्स प्रिन्स यांनी भगवे वस्त्र घातल्याचे दिसत आहे. अनेकांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून मोदींची प्रशंसा केली आहे. परंतु खरच क्राऊन प्रिन्सने भगवी वस्त्रे घातली आहेत का असा प्रश्न सध्या विचारला जातोय.
काही नेटकर्यांअनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, स्वतः मोदी टोपी घालत नाही पण शेखला भगवी वस्त्रे परिधान करायला लावेल.


हा फोटो 2019 चा आहे. तेव्हा क्राऊन प्रिन्सने मोदींना युएई सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द जायद’ देऊन सन्मानित केले होते. व्हायरल झालेला फोटो खोटा असून क्राऊन प्रिन्सने नेहमी प्रमाणे पारंपारिक कपडे घातले होते.


क्राऊन प्रिन्सहे हे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. हे फोटो खोटे असल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या