‘रन’रागिणींना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा पुरस्कार

40

सामना प्रतिनिधी, मुंबई

महिला क्रिकेट विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या हिंदुस्थानच्या संघातील महाराष्ट्राच्या ‘रन’रागिणींवर विधानसभेत कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. या ‘रन’रागिणींनी देशाची मान जगात उंचावल्याने महाराष्ट्राचीही शान वाढवली. या ‘रन’रागिणींना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या