विश्वचषकात भाग घेतलेल्या राज्यातील महिला खेळाडूंना प्रत्येकी ५० लाखाचं बक्षीस

26

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधानसभेत भारतीय महिला क्रिकेट चमूचा अभिनंदन ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महिला खेळाडूंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. महाराष्ट्रातील महिला खेळाडू मोना मेश्राम,पूनम राऊत, स्मृती मानधना यांना सरकारकडून प्रत्येकी ५० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

अभिनंदनाचा ठराव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, ” महिला क्रिकेट खेळाडूंनी भारत देशाची शान व मान उंचावले आहे. त्या सर्व खेळाडूंचे राज्यातील जनतेच्या वतीने मी अभिनंदन करतो. या चमूने पंतप्रधान मोदीजींची भेट घेतली. त्यांनीही महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील महिला क्रिकेट खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विधानसभेच्या सदस्यांनी बाके वाजवून त्या महिला खेळाडूंचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील महिला खेळाडू –  मोना मेश्राम,पूनम राऊत, स्मृती मानधना, भारतीय महिला खेळाडूंच्या डाँ. भटाचार्य. फिजिओ थेरीपीस्ट रश्मी पवार.

आपली प्रतिक्रिया द्या