मराठमोळी अभिनेत्री करतेय 11 वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट?

7973

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ ही तिच्याहून 11 वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अभिनेत्याच्या माजी प्रेयसीने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

faisal-and-sneha-muskan

अभिनेता फैजल खान याचे त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री मुस्कान कटारियासोबत अफेयर होते. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले असून मुस्कानने फैजलवर गंभीर आरोप केले आहेत. मुस्कानच्या मते फैजलचे व तिचे अफेयर असताना तो त्याचे सहअभिनेत्री स्नेहा वाघसोबत अफेयर होते. त्याने मुस्कानला धोका दिला असल्याचा आरोप तिने केला आहे. स्नेहाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘फैजल हा माझा फक्त चांगला मित्र नसून आता तो माझा कौटुंबिक मित्र झाला आहे. आमच्यावर असे चुकीचे आरोप करणाऱ्या त्या मुलीला मी बिलकूल ओळखत नाही. मी या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष आहे. त्यामुळे मला माहित आहे की हे असले स्टंट करून काही फायदा होत नाही.’, असे स्नेहाने सांगितले आहे.

फैजल व स्नेहा हे चंद्रगुप्त मौर्य या मालिकेत एकत्र काम करत होते. त्या मालिकेत फैजलने चंद्रगुप्ताची तर स्नेहाने त्याच्या आईची भूमिका केली होती. स्नेहाची याआधीही दोन लग्न झाली असून तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या