चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ लिहिलेल्या ९.९० लाखांच्या नकली नोटा जप्त

45

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबाद पोलिसांनी बनावट नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ लिहिलेल्या  ५०० आणि १०००च्या ९.९० लाख रुपयांच्या बनावट नोटा बँकेत भरण्यासाठी आला होता.

हैदराबादमधील कुशाईगुडा येथील बँक ऑफ अलहाबाद या बॅंकेत युसूफ शाईक ही व्यक्ती बनावट पैसे भरण्यासाठी आली होती. नोटा नकली असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याजवळ ९ लाख ९०० हजारांच्या नकली नोटा सापडल्या आहेत, त्यापैकी २०००च्या ४०० नोटा आहेत तर ५०० रुपयांच्या ३८० नोटा आहेत. याआधीही ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या २००० च्या नोटा दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील एटीएममधून निघाल्याचा प्रकार घडला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या