मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची बनावट वेबसाइट बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी या वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी प्ttज्sः//स्ल्.aम्.ग्ह/dग्staहम-दजह-तहग्हु हीच अधिकृत वेबसाइट असून फक्त याच वेबसाइटचा वापर करावा असेही आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विद्यापीठाने याबाबतची गंभीर दखल घेत बीकेसी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रवेश प्रक्रियेस 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी https://mucdoeadm.samarth.edu.in/ फक्त या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. तर पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षासाठी https://idoloa.digitaluniversity.ac/ फक्त या अधिपृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
तसेच विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासूनही सावधान राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र आणि मुंबई विद्यापीठ यांचे अधिकृत समाजमाध्यमांचे अकाऊंट असून फक्त अशाच अधिकृत अकाऊंट्सवरून प्रसिद्ध केलेली माहिती खरी समजण्यात यावी असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.