एकाच कुटुंबातील तिघांची तलावात उडी घेत आत्महत्या

32

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. निलेश शिंदे (३५), रुपाली शिंदे (३२) आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी निहाली शिदे अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री या कुटुंबाने नागपूरच्या फुटाळा तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपूरच्या तेलांखाडी हनुमानमंदिर परिसरात राहणाऱ्या शिंदे कुटुंबातील तिघांनी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तलावपरिसरात नागरिकांनी धाव घेतली. ही बातमी अंबाझरी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आज सकाळी तिघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, शिंदे कुटुंबियांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप कळलेलं नाही. अंबाझरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या