आई, बहिण आणि वहिनीची अब्रू लुटणाऱ्या नराधमाची कुटुंबानेच केली हत्या

9777
murder

आई, बहिण आणि वहिनीची अब्रू लुटणाऱ्या 24 वर्षीय नराधम मुलाची संपूर्ण कुटुंबाने हत्या केली. मध्य प्रदेशमधील दतिया येथे ही घटना घडली आहे. दारूच्या नशेमध्ये तरुणाने नात्यांना काळीमा फासणारे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील चार सदस्यांना अटक केली आहे.

दतिया येथील पोलीस अधिकारी गिता भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबरला गोपालदास टेकडी परिसरामध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून फेकलेला मृतदेह आढळला होता. शविच्छेदनादरम्यान तरुणाची हत्या झालेचे समोर आले. या प्रकरणी मृताच्या कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली.

हत्या झालेला तरुण दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेमध्ये तरुण आई, बहिण आणि भावाच्या पत्नीवर (वहिनी) बलात्कार करत होता. तरुणाने अनेकदा असा प्रकार केल्याने कुटुंबीय वैतागले होते आणि त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाने मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले, असे पोलिसांनी सांगितले.

11 नोव्हेंबरला तरुणाने दारूच्या नशेमध्ये मोठ्या भावाच्या पत्नीवर बलात्कार केला. याआधीही त्याने अनेकदा असा प्रकार केला होता. त्यामुळे आम्ही त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह गोपालदास टेकडीजवळ पुरला, असे हत्या झालेल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणाच्या वडिलांना, पत्नीला, मोठ्या भावाला आणि वहिनीला अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या